विद्यागौरी खरे - लेख सूची

‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’

[बघण्याच्या पद्धती  (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. 1972 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या …

हिंदू कशाचा अभिमान बाळगू शकतात आणि त्यांनी कशाचा अभिमान बाळगावा

मूळ लेखक: रामचन्द्र गुहा धर्माच्या भविष्याची चिंता करणाऱ्यांनी सुधारकांच्या कार्याचे मूल्य लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी ह्या प्राचीन, अश्मीभूत अनेक तुकड्यां ध्ये विभागल्या गेलेल्या धर्माला त्याच्या पूर्वग्रहापासून, त्याच्या संकुचित मनोवृत्तीपासून मोकळे केले.” माझ्या एका उच्चवर्णीय ‘भद्रलोक’ मित्राचे असे मत आहे की १६ डिसेंबर हा दिवस भारत-सरकारने ‘विजय-दिवस’ म्हणून साजरा करावा. १९७१ साली बांगलादेश युद्धात, पाकिस्तानी सेनेने …

एका विचारवंताची रोजनिशी

स्वतःचे विचार, भावना, येणारे अनुभव आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबतच्या प्रतिक्रिया, अशा अनेक गोष्टी माणसं नोंदत असतात. मित्रांना, सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांमधून विचारांची देवाण-घेवाण करत असतात. अनेक पाश्चात्त्य लेखकांच्या, विचारवंतांच्या अश्या डायऱ्या, जर्नल्स, पत्रसंग्रह नंतर प्रकाशित झाले आहेत. अमेरिकन कादंबरीकार जॉन स्टाइनबेक तर त्याची ग्रेप्स ऑफ राथ ही कादंबरी लिहीत असताना बरोबरच एक डायरीदेखील लिहीत असे. गाणारा …

राजकारणातील नैतिकता

मूळ लेखक : मायकेल सँडेल रीथ व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान राजकारणातील नैतिकता (Morality in Politics) ह्या विषयावर होते. व्याख्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्रसारित करण्यात आले; जिथे मायकेल सँडल होड्स् स्कॉलर म्हणून काही काळ राहिले होते. सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असलेले सत्य आणि धैर्य (Truth and Courage) हे गुण असलेल्या विद्यार्थ्यांना होड्स् स्कॉलरशिप दिली जाते. समाजाबाबत नागरिकांची …

बाजारपेठा आणि नीतितत्त्वे

मूळ लेखक : मायकेल सँडेल इंग्लंडमध्ये बीबीसीतर्फे ‘रीथ लेक्चर्स’ची एक मालिका सादर केली जाते. एखादा प्रमुख विचारवंत महत्त्वाच्या विषयावर आपले विचार ह्या मालिकेतून लोकांसमोर मांडतो. २००९ साली ह्या व्याख्यानांकरिता प्रोफेसर मायकेल सँडल ह्या हार्वर्ड विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्याला निमंत्रित केले होते. प्रोफेसर सँडल हे एक मान्यवर तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंत आहेत. ‘न्याय’ ह्या विषयावरील त्यांच्या व्याख्यानांना …

संधिकाळातील घालमेल

इंग्रजी वाययाचा अभ्यास करताना त्या वाययाची आवश्यक पार्श्वभूमी म्हणून इंग्लंडच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचे काही कालखंड वाचले होते. ते वाचत असताना सगळ्यांत ज्या गोष्टींनी प्रभावित केले ती होती नोंदींची उपलब्धता. तथ्ये, घटना, घटनांवरच्या अनेक टीकाटिप्पणी काळाच्या ओघात नाहीशा होऊनही एवढ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या ह्याचे आश्चर्य वाटल्याचे आजही आठवते. चर्चच्या रजिस्टरमधील जन्म, मृत्यू, विवाह ह्या अटळपणे …

विस्तारणारी क्षितिजे

नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये दृश्यकलेचा एक अभूतपूर्व उत्सव साजरा केला गेला. “विस्तारणारी क्षितिजे’ नावाचे आधुनिक आणि समकालीन भारतीय दृश्यकलेचे एक प्रदर्शन त्या काळात नागपूरमध्ये भरले होते. ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आणि जणुकाही त्याच्या स्वागतासाठी म्हणून नागपुरातील सिस्फा आर्ट गॅलरीने शहरातील लहान-मोठ्या आर्ट गॅलरीजमध्ये अनेक छोटी छोटी प्रदर्शने भरवली होती. आठवडाभर नागपुरातील चित्ररसिकांना कलेची एक मेजवानीच …

सीमांतापासून सीमांतापर्यंत दलित

समकालीन वादविवादांमध्ये उपेक्षित वर्गांच्या (disadvantaged groups) सामाजिक बहिष्कृतीची आणि समाजातील मुख्य प्रवाहाच्या बाहेर असण्याची (marginalisation) चर्चा वारंवार होते. बहिष्करणाच्या ह्या चर्चेने पूर्वी वापरात असलेले शोषण, वर्चस्व आणि दडपणूक हे शब्द मागे टाकले आहेत. बहिष्कृती आणि marginalisation ला प्रतिक्रिया म्हणून वेगळ्या संज्ञा प्रचलित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उदा. अधिकाराचा आग्रह (entitlement), सबलीकरण (empowerment) आणि सामाजिक …

आरक्षणाबाबतची तीन मिथ्ये – नीरा चंधोके

अनुवाद इतर मागासवर्गीयांच्या (OBC) आरक्षणाबाबत सध्या जो चर्चेचा गोंधळ सुरू आहे त्यात विवेकी युक्तिवादाची पिछेहाट झाली आहे. बचावात्मक भेदभाव (Protective discrimination) आणि सकारात्मक कृती (affirmative action) ह्याबद्दलही वैचारिक गोंधळ आहे, शिवाय आरक्षणामुळे भिन्नतेबद्दल आदर निर्माण होईल अशी चुकीची समजूत आहे. बचावात्मक भेदभावाच्या धोरणाला चुकीच्या कारणांकरता पाठिंबा मिळत आहे. सार्वजनिक चर्चा आणि वैचारिक युक्तिवादाची जुनी परंपरा …

‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’

[बघण्याच्या पद्धती (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. १९७२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या …

भयमुक्त शिक्षणासाठी

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या वर्तमानपत्रांमधून दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. ही मुले विद्यार्थी होती आणि शिक्षणाशी संबंधित व्यवहारातून ती आत्महत्येला प्रवृत्त झाली. एका विद्यार्थ्याला कॉपी केल्या-बद्दल शिक्षकांनी बेदम मारहाण केली म्हणून त्याने आत्महत्या केली आणि दुसऱ्याने परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य येऊन आत्महत्या केली. परीक्षा आणि त्यातील यशापयश ह्याचा आणि पर्यायाने शिक्षणाचाही विचार फार व्यापक पातळीवर …

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग ४)

प्राथमिक शिक्षणावरच्या प्रोबच्या अहवालावरील हा शेवटचा लेख. आत्तापर्यंतच्या तीन लेखांत त्यांतील पहिल्या पाच प्रकरणांचा जरा विस्ताराने आढावा घेतला. ह्या शेवटच्या लेखात उरलेल्या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे फक्त त्रोटक-पणे नोंदून हिमाचल प्रदेशामध्ये झालेल्या ‘शैक्षणिक क्रांतीची’ माहिती मात्र विस्तृतपणे देत आहे. आतापर्यंत प्रोब अहवालात वरचेवर येणारे ‘निराशा’, ‘निरुत्साह’, ‘जबाबदारीची उणीव’ ह्या शब्दांऐवजी ‘प्रोत्साहन’, ‘उत्साह’, ‘जबाबदारीची जाणीव’ ह्या …

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग ३)

४. शाळा–परिसर, सोयी, वातावरण १. अपुऱ्या सोयी —- प्रोब सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात शाळांची संख्या वाढली आहे. शाळेला क्रीडांगण असणे, शाळेत खडू–फळा असणे, ह्यासारख्या सोयीही वाढल्या आहेत. पण तरीही शाळेच्या एकूण घडणीसाठी ह्या सोयी फार अपुऱ्या आहेत. नियमानुसार शाळेला निदान दोन पक्क्या खोल्या, दोन शिक्षक, शिकवण्यासाठी फळे, नकाशे, तक्ते, ग्रंथालये यांसारखी साधने असायला हवीत. प्रोब राज्यांमधल्या …

प्रोब – पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग २)

प्रोब अहवालाची एक विस्तृत प्रस्तावना डिसेम्बर २००० च्या आ.सु.च्या अंकात प्रसिद्ध केली होती. उरलेल्या अहवालाचा संक्षेप करताना जाणवले की अहवालातील प्रत्येक मुद्दाच नव्हे तर त्या मुद्द्यांचा विस्तारसुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळे त्या सगळ्याचा गोषवारा एक लेखात उरकणे हे फार कठीण काम आहे. म्हणून लेखांची संख्या वाढवायचे ठरवले. तरीही आकडेवारी, तक्ते आणि असंख्य उदाहरणे – ज्यामुळे ह्या …

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग १)

पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने १९९९ मध्ये प्रसिद्ध केलेला अहवाल हातात आला तेव्हा त्याच्या दोन वैशिष्ट्यांमुळे तो वाचण्याची उत्सुकता वाढली. एक म्हणजे हा सरकारी कमिटीने सरकारसाठी ‘बनवलेला’ अहवाल नव्हता तर काही जागरुक संशोधकांनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स ह्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील विभागाच्या मदतीने भारतीय नागरिकांसाठी तयार केलेला भारतातील …

समाजवाद, बाजारपेठा आणि लोकशाही

गेले काही दिवस समाजवादी तत्त्वांची पिछेहाट वेगाने होत आहे आणि भांडवलशाहीचे नव्याने कौतुक होत आहे. हे कौतुक बाजारपेठांवर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देदीप्यमान यशामुळे होत आहेच पण समाजवादी देशांच्या पिछेहाटीमुळेही होत आहे. सोव्हिएट रशियां, पूर्व युरोपीय देश आणि चीन ह्यांसारख्या देशांमध्ये पारंपरिक समाजवादी पद्धतींपासून अलग होण्याची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. समाजवादी तत्त्वांची छाननी, अंतर्गत टीका …

दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (३)

ह्यानंतरच्या भागात वर्मा नैतिकतेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या सामाजिक तणावाचा मागोवा घेतात. नक्षलवादी चळवळीचा उदय आणि अस्त, जयप्रकाश नारायणांची नवनिर्माण चळवळ, १९७४ चा इंदिरा गांधींनी चिरडून टाकलेला देशव्यापी रेल्वे-संप आणि लगेच पोखरणला केलेली भूमिगत अणुचाचणी आणि सरतेशेवटी आणीबाणी. ह्या सर्व घटनांमधून वर्मा मध्यमवर्गाच्या मनोवृत्तीचे फार चांगले विवरण करतात. ह्या मनोवृत्तीला ख-या अर्थाने धक्का बसला १९९० मध्ये …

दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (२)

१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिश प्रशासकांच्या जागी भारतीय प्रशासक आले पण प्रशासनाचे स्वरूप जवळपास तेच राहिले. ब्रिटिश आराखड्यावर भारतीय संसदीय लोकशाहीचे स्वरूप आखले गेले. भारतीय प्रशासकीय सेवा, न्यायसंस्था, सैन्यदल, शिक्षणपद्धती सगळे जवळपास त्याच स्वरूपात पुढे चालू राहिले. वर्माच्या मते हे सातत्य टिकले कारण मध्यमवर्गाची स्वातंत्र्याची कल्पनाच ती होती. ब्रिटिशांची हकालपट्टी त्यांना हवी होती पण …

दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (१)

भारतातील मध्यम-वर्गाचा हा संशोधनपूर्वक अभ्यास पवन वर्मानी अतिशय प्रभावीपणे आणि आश्चर्यकारक पोटतिडकेने सादर केला आहे. इतिहासाचे आणि कायद्याचे पदवीधर असलेले वर्मा भारतीय विदेशसेवेत एक अधिकारी आहेत. राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी म्हणून आणि इतर अनेक जबाबदारीच्या अधिकारपदांवर त्यांनी काम केले आहे आणि सध्या ते विदेश कार्यालयाचे अधिकृत प्रतिनिधी, प्रवक्ते (spokesman) आहेत. ह्या आधीची वर्माची पुस्तके वेगळ्या प्रकारची …

शतकाचा ताळेबंद

१३ एप्रिल १९९८ चा टाईम साप्ताहिकाचा अंक हा संग्राह्य असा विशेषांक आहे. २० व्या शतकाच्या ह्या संधिकालात गेल्या १०० वर्षांत होऊन गेलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर आणि त्यांचा सहभाग असलेल्या महत्त्वाच्या घटनांवर एक प्रकाशझोत टाकून १०० वर्षांच्या इतिहासाचा दस्तऐवज वाचकांसमोर मांडण्याचा टाइमच्या संपादकमंडळाचा विचार आहे. असे एकंदर सहा विशेषांक निघणार आहेत. हा पहिला विशेषांक जगातील प्रभावी राजकीय …

औद्योगिक क्रान्तीचे पडसाद

१९ व्या शतकातील व्हिक्टोरियन वाङ्मयाचा अभ्यास करताना नेहमी जाणवायचा तो त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे व्यापून टाकणारा औद्योगिक क्रांतीचा प्रचंड बॅकड्रॉप. राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, साहित्यिक इ. कुठलेही क्षेत्र त्याच्या सर्वव्यापी प्रभावापासून मुक्त नव्हते. १९ वे शतक हा सर्वार्थाने स्थित्यंतराचा काळ. व्हिक्टोरिया राणीच्या स्थिर आणि खंबीर राजवटीच्या खांबाभोवती हे बदलाचे गोफ विणले गेले. प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे …

सी. पी. स्नो ह्यांच्या दोन संस्कृती” ह्या पुस्तकाच्यानिमित्ताने (उत्तरार्ध)

गेल्या वीस वर्षांतील ‘नवीन भौतिकीमुळे भौतिक शास्त्राच्या पारंपारिक कल्पनेतही महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. ह्या बदलांचे वर्णन कॉलिनी पुढील शब्दांत करतो,क्वाँटम भौतिकी” “आणि “केआस थिअरी” सारख्या नवीन कल्पनांनी द्रव्याच्या (matter) गुणधर्माचे जुने जडवादी (mechanistic) रूप – जे न्यूटनपासून प्रचलित होते – टाकून द्यायला भाग पाडले आहे. शिवाय सैद्धांतिक भौतिकी (Theoretical Physics), खगोलशास्त्र (Astronomy) आणि विश्वरचनाशास्त्र …

सी.पी. स्नो ह्यांच्या दोन संस्कृती :ह्या पुस्तकाच्या निमित्ताने

विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा तिहेरी भूमिकेतून आजपर्यंत शिक्षणाशी जेव्हा संबंध आला तेव्हा ज्या अनेक गोष्टी जाणवल्या त्यातील एक महत्त्वाची म्हणजे विज्ञान आणिकला ह्या दोन शाखांमधील वाढत जाणारे अंतर. मी विद्यार्थीदशेत असताना हे अंतर फार नव्हते, स्पर्धाही जीवघेणी नव्हती. कलाशाखेतील विद्याथ्र्यांना विज्ञान-तंत्रज्ञान वगैरे शाखांमधील लोकांबद्दल आदर होता, पण स्वतःबद्दल न्यूनगंड नव्हता. पराभूतपणाची भावना तर अजिबात नव्हती. …

उत्तमतेच्या समर्थनार्थ

पुढील लेख एका अमेरिकन लेखकाने अमेरिकेतील शिक्षणाविषयी लिहिलेला आहे. परंतु तो भारतातील शिक्षणविषयक परिस्थितीलाही तितकाच लागू आहे हे वाचकांच्या लक्षात येईल. संपादक ‘Tinic’ साप्ताहिकाच्या २९ ऑगस्ट १९९४ च्या अंकात एका पुस्तकाचा काही भाग प्रसिद्ध झाला आहे. पुस्तकाचे नाव आहे In Defense of Elitism आणि लेखकआहे William A. Henry III. हेन्री ‘टाईम’ मध्ये रंगभूमीबद्दल नियमित समीक्षात्मक …